नंदुरबार l प्रतिनिधी
येथील लायन्स क्लबतर्फे शाहीर हरिभाऊ पाटील पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन श्रॉफ हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य बी. एस. पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. पितांबर सरोदे, छाया संगीत विद्यालयाच्या प्रमुख सुनीता चव्हाण , चंद्रशेखर चव्हाण,लायन्स रिजन चेयरपर्सन हीना रघुवंशी,झोन चेयेरमन शीतल चौधरी,लायन्स क्लब अध्यक्ष शत्रुघ्न बालाणी, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी, फेमिना क्लब सचिव रागिणी पाटील,प्रोजेक्ट चेयरमन शेखर कोतवाल, सुप्रिया कोतवाल आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पार्थ घासकडबी याच्या राग गुजरी तोडी गायनाने व त्या नंतर संत कबीर यांच्या निर्भय निर्गुण या निर्गुणी भजनाने झाली.यानंतर कौशल्या दशरथ के नंदन – रवी सुर्यवंशी, यशोमती मैय्या से बोले नंदलाला – राजेंद्र माहेश्वरी, वारा गाई गाणे – डॉ. गौरवी बोरसे, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे – भूषण पुराणिक,गारवा – अजय वळवी,देहाची तिजोरी – डॉ जयंत शाह,दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे – राकेश कलाल,

भारत का बच्चा बच्चा अब जय श्रीराम बोलेंगा – डॉ. संदीप बोरसे, अच्युतम केशवम – शशी हनुवते,शोधिसी मानवा राउळी मंदिरी – डॉ. राजेश कोळी, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा – श्रीराम दाऊतखाने,ना कष्ट हरो छो दयाळा – प्रग्नेश दवे,राजा ललकारी – मीनल म्हसावदकर,प्रभू तू दयाळू – अनिल पाटील,ज्योत से ज्योत जगाते चलो – रणजित राजपूत,असे एकाहून एक सरस भक्तीगीत व भावगीते कराओके व लाईव्ह सादर झाली.
कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्राचा भजन सम्राट स्पर्धेतील अंतिम २० मध्ये निवड झालेल्या पुण्याचे प्रा. प्रशांत पवार, यांच्या गायनाने झाली.त्यांनी सुरुवातीला राग भैरव मधील एक चीज, हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत व शेवटी अगा वैकुठीच्या राया या भैरवी रागातील अभंगाने मैफिलीची सांगता केली.अभंगाच्या शेवटी केलेल्या विठ्ठल गजराने रसिक भारावून गेलेत.या मैफिलीत तबला साथ ऋतुपर्ण डांगे यांनी तर हार्मोनियम साथ प्रसन्न दाउतखाने यांनी केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पाटील व श्रीराम दाउतखाने यांनी केले.या कार्यक्रमास शहरातील रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.








