नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील काकासाहेब गल्लीमध्ये एका घरासमोर करणे करून ठेवलेले नारळ अंसिस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन फोडून लोकांसमक्ष फोडून खाल्ले व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा व भीती दूर करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी तळोदा शहरातील काका शेठ गल्लीमध्ये एका घरासमोर एक लाल दोरा गुंडाळलेले नारळ व दिवा ठेवलेला सकाळीं स्थानिक रहिवाशांमा आढळून आला.सोमवारी अमावस्या व मंगळवारी दिवाळी पाडवा असल्याने करणी,जादूटोणा करून नारळ व दिवा ठेवला असल्याचा संशय नागरीकांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात मोठी भीती पसरली.
याबाबतची माहिती स्थानिक रहिवाशांनी तळोदा शहरातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.त्यानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. डी बी शेंडे, माजी जिल्हा प्रधान सचिव सिद्धार्थ महिरे,जिल्हा कार्यवाह मुकेश कापुरे, तळोदा शाखा सचिव अमोल पाटोळे, सहसचिव सुनील पिंपळे,सामाजिक कार्यकर्ते मित्तलकुमार टवाळे, संदीप मुके, सिद्धेश्वर गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची पाहणी केली.दरम्यान,गल्लीमध्ये अधून-मधून सातत्याने हा प्रकार होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
स्थानिक रहिवाशांच्या मनात निर्माण झालेले अंधश्रद्धा व भीती दूर करण्यासाठी अनिसच्या शिष्टमंडळने करणी करून ठेवलेले नारळ त्याच ठीकणी फोडून नारळ प्रसाद म्हणून खाल्ला.या प्रसंगी मुकेश कापूरे यांनी अशा प्रकारे करणी जादूटोणा करणेने काहीही अनुचित प्रकार किंवा कोणाचेही नुकसान करता येत नाही याबाबत प्रबोधन केले.दरम्यान अशा घटना घडवून कोणी जर समाजात भीती अंधश्रद्धा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्यास त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत प्रतिबंध घालता येतो अशा प्रकारचे प्रबोधन महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी केले.
दरम्यान अनिस कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रबोधनानंतर स्थानिक नागरिकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली.अनेक नागरिकांनी व त्या ठिकाणीं उपस्थित असणाऱ्या लहान मुलांनी देखील जादूटोणा करून ठेवलेले नारळ अनिसच्या कार्यकर्त्यांसोबत प्रसाद म्हणून खाल्ले.








