नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे महावीर स्वामी यांच्या 2550 वा निर्वाण महोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
शहरातील माणिक चौक परिसरात असलेल्या दिगंबर जैन समाजाच्या सर्व सिद्धीदायक 1008 अजितनाथ दिगंबर जैन मंदिरात कार्तिक अमावस्या निमित्त सोमवारी विविध धार्मिक उपक्रम घेण्यात आले.यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षकालनिमित्त 75 किलोच्या लाडूचा प्रसाद महावीर भगवान चरणी अर्पण करण्यात आला.लाडूचा महाप्रसाद बनविण्यासाठी महिला मंडळाचे अमूल्य योगदान ठरले.
डीजे आणि इतर वाद्य पर्यावरणाला पूरक नसून पारंपारिक पद्धतीने सनई वादन लावून धार्मिक उपक्रम घेण्यात आले.अशी माहिती दिगंबर जैन समाजप्रमुख आणि दिगंबर जैन समाज महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली. याप्रसंगी कार्यक्रमास आबाल वृद्धांसह युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिगंबर जैन समाज आणि महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय अजमेरा यांनी केले.








