नंदुरबार l प्रतिनिधी
लायन्स क्लब नंदुरबारतर्फे दरवर्षी दीपोत्सव पर्वानिमित्त पाडव्याच्या दिवशी पहाटे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येते. यंदा स्व. शाहीर हरिभाऊ पाटील पहाट पाडवा कार्यक्रम मंगळवार दि.14 नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या पहाटे सकाळी 6 वा.श्रॉफ हायस्कूल मधील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. या कार्यक्रमात लायन्स क्लब सदस्य व शहरातील काही गायक, शास्त्रीय संगीत, भक्तिगीते,भावगीते सादर करणार आहेत. यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या भजन सम्राट स्पर्धेत टॉप 20 मध्ये निवड झालेले प्रशांत पवार व पुणे येथील पार्थ घासकडवी हे गायक आपली कला सादर करणार आहेत.
हा कार्यक्रम वेळेवर पहाटे 6 वाजता सुरू होईल. रसिकांनी यापहाट पाडव्या कार्यक्रमास उपस्थित राहून गायनाचा आनंद घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब अध्यक्ष शत्रुघ्न बालाणी,सचिव अश्विन पाटील, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी,प्रोजेक्ट चेयरमन शेखर कोतवाल यांचेसह लायन्स परिवाराने केले आहे.








