शहादा l प्रतिनिधी
नवरात्र महोत्सवास सुरवात झाल्याने शहरातील गल्लोगल्लीत देवीची स्थापना करण्यात आली आहे. महिला भाविक देवीच्या दर्शनाबरोबर गरबा नृत्यात मग्न आहेत.सुखी समृद्धी आरोग्यमय आनंदी जीवनासाठी सदाशिव नगरातील श्रीदुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळाच्या नारी ते नारायणी महिला मंडळाच्या वतीने श्रीदुर्गा सप्तशती वाचन करण्यात आले आहे.
घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे.शहरातील अंबाजी माता मंदिर,श्रीसप्तशृंगी माता मंदिर, आई तुळजाभवानी माता मंदिर, भावसार मढीतील आई हिंगलाज माता मंदिर, आई म्हाळसा मंदिरात नवरात्र उत्सवा दरम्यान पहाटे पासुन रात्री उशीरा पर्यंत भाविक भक्तांची दर्शनासाठी आलोट गर्दी होत असते. तसेच शहरातील गल्लोगल्लीत नवीन वसाहतीत काँलनी निहाय देवीची प्रतिमा फोटो अथवा मुर्ती ठेवत दोघे वेळी पुजा होत असते.
सांयंकाळी गरबा डान्स होतो.प्रकाशा रोड लगत असलेल्या सदाशिव नगर, रामकृष्ण नगर, महावीर नगर, यासह विविध भागातील महिलांनी देवीची स्थापना केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून देवीच्या मंडपासमोर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतेते.लहान मुलांसाठी गोणपाठ, लिंबु चमचा, संगीत खुर्ची, अंधळी कोशिंबीर यासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. एवढेच नव्हे तर नारी ते नारायणी या महीला मंडळा कडुन श्रीदुर्गा सप्तमी ग्रंथ वाचन करत या शहरासह संपूर्ण परिसर सुखी समृद्ध व्हावे, नदी नाल्यांमध्ये पाणी संततधार वहात राहावे, जीव जंतू जनावरे यासोबत प्रत्येक घरातील व्यक्तीचे आरोग्य सुदृढ राहावे, प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार करावा,
याकरिता नारी ते नारायणी या महिला मंडळाकडून श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन करण्यात येते. गेल्या आठ वर्षापासून बालसंस्कार केंद्र युवा प्रबोधन यांचे कार्यक्रम होत असतात. देवीचे पठण केल्यास साडेतीन पिठाचे पूजन केल्याचे पुण्य या श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन केल्याने होत असते अशी भाविकांची श्रद्धा आहे.








