शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे पर्यावरण मॉडेल आणि पोस्टर प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी वाढत्या लोकसंख्येचा आणि औद्योगीकरणाचा पर्यावरणावर होणारा परिणाम, विकास प्रक्रिया आणि पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास, जैवविविधता, आरोग्यविषयक चांगल्या सवयी, औषधी वनस्पतींचे उपयोग, परिसंस्था, पृथ्वी वाचवा- जीवन वाचवा, पर्यावरण पूरक जीवनशैली अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी मॉडेल्स, पोस्टर्स बनवलेले होते.
त्यात प्रथम क्रमांक औषधी वनस्पतींचे उपयोग हे मॉडेल बनवणारा मेहुल विलास पाटील (इ.११.वी.) विज्ञान, तर द्वितीय क्रमांक नंदना प्रकाशन नांबियार पृथ्वी वाचवा जीवन वाचवा या विषयावरील आणि तृतीय क्रमांक चेतना ,रोशनी ,धनश्री व चंचल पाटील यांच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा शाश्वत वापर या मॉडेलला मिळाला आहे. परिक्षक म्हणून प्रा. लक्ष्मण बोरसे, प्रा. शिवनाथ पटेल यांनी कामकाज पाहिले.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. श्रीमती कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,ज्येष्ठ प्राध्यापक व्ही.सी.डोळे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.श्रीमती उर्मिला पावरा यांनी केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.








