नंदूरबार l प्रतिनिधी
शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर ता. नंदुरबार येथील विद्यार्थिनी पूनम विजयसिंह पावरा हिची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
नुकत्याच नाशिक येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात पुनम विजयसिंह पावरा या विद्यार्थिनीने तिहेरी उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय स्पर्धा 26, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रपूर येथे होणार आहे.
नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन मा. आ. चंद्रकांत रघुवंशी,व्हॉईस चेअरमन मनोज रघुवंशी, सरचिटणीस यशवंतराव पाटील, कार्यालयीन अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी,प्राचार्य आर.एच.बागुल, पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील यांनी पूनम पावरा चे कौतुक केले. तसेच क्रीडा शिक्षक ए.एस.शिंदे, के.जी.बेडसे, एन. जी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर वृंद यांनीही कौतुक केले.








