नंदुरबार l प्रतिनिधी
उद्योग मंत्री उदय सामंत उद्या शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
शुक्रवार दि. २० रोजी सकाळी ११ वाजता उद्योग मंत्री उदय सामंत नवापूर येथे जनरल पॉलीफिल्म, एमआयडीसीचे भूमिपूजन करतील. ११.३० वाजता त्याच ठिकाणी जिल्हा मओविम व उद्योग विभागाच्या आढावा घेतील.यावेळी मंत्री सामंत टेक्सटाईल इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील.
दुपारी १२ वाजता नवापूर येथून मोटारीने प्रयाण करतील. नंदुरबार येथे १ वाजता आगमन व जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १.३० ते २ वाजे पर्यंत राखीव. २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात लोकप्रतिनिधी,शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. याप्रसंगी मंत्री सामंत मार्गदर्शन करतील.कार्यक्रमांना जि.प सदस्य, पं.स सभापती,नगरसेवक, पं.स सदस्य,सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी,किरसिंग वसावे यांनी केले आहे.








