नंदूरबार l प्रतिनिधी

कारखान्याने मागील गळीत हंगामृ – २०२२ – २३ मध्ये गळीतास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रति मे.टन २३५०/- प्रमाणे एकरकमी सरसकट चालु हंगामात वेळेत अदा केलेला आहे. उस दराचा दुसरा हप्ता सरसकट रु.१००/- प्रति में.टन प्रमाणे दिवाळी पुर्वी रु. १०.६१ कोटी अदा करण्याचा निर्णय घेतला असुन सदर दर हा निघत असलेल्या एफ. आर. पी. पेक्षा रु.८५/- प्रति में.टन जास्त आहे.
तसेच भागातील इतर कारखान्यांपेक्षा रु. १००/- ते १२५/- जास्त आहे. यामुळे आयान शुगर चा अंतिम उसदर रु.२४५०/- प्रति में. टन होणार आहे. उच्चांकी, एकरकमी व सरसकट उस दराची परंपरा कायम राखुन पारदर्शक व योग्य व्यवस्थापनामुळे शेतकर्यांची विश्वासार्हता कायम ठेवली आहे, अशी माहिती संचालक सचिन एस.सिनगारे यांनी दिली.
शेतकर्यांची आर्थिक क्रांती घडवुन आणलेल्या महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्हात कारखान्याने मागील १२ वर्षातील गाळपाचे सर्व रिकॉर्ड मोडुन कमी दिवसांत नोंद – बिगर नोंद उसाचे जास्तीत जास्त गाळप करुन नवनवीन विक्रम करत आहे. मागील २ वर्षा पुर्वी अतिरीक्त उस असताना संपुर्ण उसाचे गाळप करुन शेतकर्यांना शासनाकडुन रु.२००/- सबसिडी येण्यापुर्वी शेतकर्यांना अदा केलेली होती. उस विकासाच्या दृष्टीकोनातुन प्रचंड केलेली मदत यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली असल्याने सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे जिल्हात प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल झालेली आहे.
नंदुरबार जिल्हातील समृध्दीची दालने खुली केली आहेतच त्यामाध्यमातुन शेतकरी, शेतमजुर, उसतोड कामगार आणि त्यावर आधारित शेकडो व्यावसायिकांच्या हाताला रोजगारही दिला आहे. त्यांना जगण्याचे बळ दिले आहे. कारखान्याने उसाचे व्हरायटीत बदल केला असुन उसासाठी लागणारे चांगल्या प्रतिचे उस बियाने, प्रेसमड उधारिने उपलब्ध करुन दिले आहे. सुधारीत जातीचे ऊस बियाणे पट्टा पध्दतीने लागवड करणे व कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणेसाठी शेतकर्यांना प्रवत्त करणे यासाठी शेतकर्यांना गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आगामी गाळप हंगाम-२०२३-२४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यासाठी ऊस नोंदी, ऊस तोडणी वाहतुक व हार्वेस्टर यंत्रणा सज्ज असुन कारखान्याची अत्याधुनिक गाळप क्षमता यामुळे दररोज १० हजार मे. टनाचे गाळप होणार असुन या वर्षी उस क्षेत्रात घट झालेमुळे सीमाभागातील, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेबाहेरील इतर कारखान्यांच्या भुलथापांना बळी पडु नये.
अपेक्षेप्रमाणे गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करणार आहोत. तरी जास्तीत जास्त गाळप करणार असुन कारखाना पुर्ण क्षमतेने चालवुन उसाचे गाळप करणेसाठी संगणकीकृत अचुक उस वजन काटा, उस तोडणीत पारदर्शकता ठेवुन प्रोग्राम प्रमाणे नोंद व बिगर नोंद संपुर्ण उसाचे गाळप करुन चांगला उसदर व दरवर्षी प्रमाणे वेळेत पेमेंट देणार असल्याची माहिती संचालक सचिन एस. सिनगारे यांनी दिली. व सर्व शेतकरी बंधुना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छां दिल्या.









