शहादा l प्रतिनिधी
परिसराचे नेते,सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित पुरुषोत्तम चषक- २०२३ खान्देश स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेला तालुक्यासह खान्देशातील खेळाडू व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालय येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पुरुषोत्तम चषक-२०२३, खान्देशस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन दीपकभाई पाटील यांनी दीपप्रज्वलन करत बुद्धिबळाच्या पटावर चाल चालवत औपचारिकपणे केले.यावेळी संपूर्ण खान्देशातील एकूण 180 खेळाडूंसह मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर. एस पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल, प्राचार्य बी.के. सोनी, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल,प्रा.डॉ.एस.डी सिंदखेडकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या के.के.पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुरभाई दीपक पाटील,पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे, स्पर्धा पंच मंडळ प्रमुख शोभराज खोंडे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक प्रा. मनीलाल चौधरी,प्रा अरविंद पाटील आदि उपस्थित होते.
आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक दृष्ट्या सक्षम असण्या सोबतच मानसिक दृष्ट्या देखील सक्षम असणे गरजेचे आहे,व ते आपण बुद्धिबळ खेळून राखू शकतो. आपल्या देशात सध्या बुद्धिबळ खेळाची लोकप्रियता वाढतांना दिसून येत आहे. व त्या सोबतच त्याचे परिणाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंच्या रूपाने आपण बघू शकतो. नंदूरबार जिल्ह्यातील नारायणी मराठे ह्या खेळाडूनी सात वर्षाआतील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
त्याच बरोबर चालू वर्षी झालेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत देखील अवघ्या अठरा वय वर्षे असलेल्या भारताचा ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली व रजत पदक प्राप्त केले आणि देशाचे नाव जगभरात उंचावले. ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे व राष्ट्राचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन दीपकभाई पाटील यांनी केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.स्पर्धेत नाशिक, जळगाव,धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील पाटील परिवारातील आजी, मुलगा व नातवंड असे एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत पंच म्हणून शोभराज खोंडे, अश्वमेघराज खोंडे, सागर महाजन, विनीत बागुल, मनिलाल चौधरी,डॉ. जी. एस. गवई,प्रा. जितेंद्र माळी , प्रा. डॉ.एम.बी. जगताप, प्रा. हितेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.स्पर्धेचे बक्षीस वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, उपप्राचार्य डॉ.एम. के. पटेल,प्रा.डॉ.एस.डी सिंदखेडकर, श्रीमती.के.के पटेल, आय. टी. आय. कॉलेजचे प्राचार्य आर.एस पाटील, पर्यवेक्षक के.एच.नागेश, शोभाराज खोंडे, प्रा.मनिलाल चौधरी,प्रा.अरविंद पाटील यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले.स्पर्धेचा निकाल महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. अरविंद कांबळे यांनी जाहीर केला.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
अकरा वर्षां आतील गट-
प्रथम:- पाटील अद्वैत
द्वितीय:- भामरे देवांशू
तृतीय:- चव्हाण साक्षी
चतुर्थ:- मराठे नारायणी,पाचवे:- देवरे दक्षिल, सहावे:- पाठक सुकृत, सातवे:- घरटे शौर्या, आठवे:- धनगर केतन,नववे:- चौधरी शौर्या, दहावे:- चौधरी क्रियांश
पंधरा वर्षा आतील गट:-
प्रथम:- बागुल निकिता,
द्वितीय:- पालीवाल यशोदिप,
तृतीय:- रणदिवे जयदीप,
चतुर्थ:- राजपाल मनमित,
पाचवे:- मानकर वैष्णवी, सहावे:- कुकावलकर भावेश , सातवे:- चव्हाण कुणाल, आठवे:- महाजन हर्ष, नववे:- पाटील नीलय, दहावे:- पाटील शिवराज
खुला गट:-
प्रथम:- देवांग कल्पेश
द्वितीय:- पाटील जितेंद्र
तृतीय:- पाटील मयूर
चतुर्थ:- चव्हाण विवेक
पाचवे:- कासार गुणवंत
सहावे:- खर्चाने आम्रपाली, सातवे:- घोडके नितीन, आठवे:- सोनार ऋषिकेश, नववे:- गोरे रुचिता, दहावे:- पाटील पंकज,
उत्तेजनार्थ:- बोरसे सुरेश, पाटील शशिकला
सात वर्षा आतील गटातील उत्तेजनार्थ:- महाले सुशांत, जैन स्वरा
आठ वर्षा आतील गटातील उत्तेजनार्थ:- पाटील हार्दिक, जाधव काव्या.
नऊ वर्षा आतील गटातील उत्तेजनार्थ:- शर्मा तीर्थ, शिंदे यामिनी.
दहा वर्षा आतील गटातील उत्तेजनार्थ:- वाघ भाविन, शर्मा हिमक्षी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. अरविंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. जितेंद्र माळी यांनी मानले.स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा. एस. एल. भालेराव,प्रा.एस. आर. उजगरे, डॉ.सी.एस. सुतार, प्रा. एन. के. आठवले, प्रा. ए.पी. पाटील. प्रा. पाठक, संजय विसावे, डी जी. ठाकरे, आशिष सोनवणे, विजय भुजबळ आदिंनी सहकार्य केले.








