Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

team by team
October 2, 2021
in राजकीय
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी  जाहीर करण्यात आली आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार मतदार कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदी सर्वांना लागू राहील. यात खासगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे,व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान कंपन्या,  शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर आणि अन्य आस्थापनांचा देखील समावेश आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्यांना मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टी ऐवजी दोन तासाची सवलत देता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असेल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना दोन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता सर्व आस्थापनांनी घ्यावी. असे उपजिल्हाधिकारी ( महसुल प्रशासन ) तथा नोडल अधिकारी जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूक, कल्पना निळ-ठुबे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

Next Post

नंदुरबार येथे भीलीस्थान लायन सेनेचा चौथा वर्धापन दिन साजरा

Next Post
नंदुरबार येथे भीलीस्थान लायन सेनेचा चौथा वर्धापन दिन साजरा

नंदुरबार येथे भीलीस्थान लायन सेनेचा चौथा वर्धापन दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add