नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड ता.नंदुरबार शाळेत मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस यशवंत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक तथा नंदुरबार शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी .के. पाटील, नवजीवन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील,भादवडचे सरपंच युवराज पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच हसरत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे माजी सभापती संतोष पाटील ,
माजी. ग्रामपंचायत सदस्य सरदार सिंग गिरासे ,माजी उपसरपंच रमेश पाटील ,योगेश गिरासे , शालेय शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष विजय पाटील व गावातील जेष्ठ मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन स्व. बी. के. रघुवंशी, स्व विमलताई रघुवंशी व सरस्वतीं यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी इशस्तवन , स्वागत गीता द्वारे मान्यवरांचे स्वागत केले. इयत्ता नाववीची विद्यार्थिनी हेतल वाघ हिने लाभार्थी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.झिरवे व बलदाणे येथून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना व विद्यालयातील कर्मचाऱ्यांना शालेय उपस्थिती, शालेय गुणवत्ता वाढ ,विद्यार्थी विकासाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. विद्यालयातील क्रीडा स्पर्धेत व गणित संबोध परीक्षेत सहभाग घेऊन यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए .बी .पाटील यांनी तर सूत्रसंचालन टी .जी. पाटील यांनी व आभार एच. एस. साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोला चे सहकार्य केले.