नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद विद्यामंदिर (शाळा) काकर्दे येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.
सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या अध्यक्षते खाली सभा घेण्यात आली. यावेळी शाळेत पालक परिषद व सभा घेऊन आर. टी. ई . नुसार शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी कमलेश ठाकरे, उपाध्यक्ष विठोबा माळी यांची निवड करण्यात आली.