नंदुरबार. l प्रतिनिधी

महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन नंदुरबार यांच्या वतीने दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नंदुरबारात १६ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले-मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
१६ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले- मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रातून 42 संघांनी सहभाग नोंदविला त्यात 21 संघ मुलांचे व 21 संघ मुलींचे आहेत. यात राज्यातून सुमारे 500 खेळाडूंचा समावेश आहे.
उदघाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी खेळाडूंना बालपणातील खेळासंबंधीचे काही उदाहरण देऊन प्रोत्साहित केले. तसेच संसद रत्न खासदार डॉक्टर घेण्यात आहे स्वतः आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित या शालेय जीवनापासून उत्तम क्रीडापटू असल्याची माहिती देऊन काही प्रसंग विशद केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपले व्यक्तिमत्व आणि दृष्टिकोन विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धा आणि खेळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आज नंदुरबार येथे उत्तम क्रीडा प्रशिक्षक उपलब्ध झाले आहे याला कारण आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी सुद्धा जातीने प्रयत्न केले त्यामुळे चांगल्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून क्रीडापटू घडायला मदत झाली आहे. जिल्ह्यात खेळाचे वातावरण तयार व्हावे यासाठी नंदुरबार येथे हे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, ॲड. राजश्री वळवी, नेटबॉल खेलकूद युवा असोसिएशन नंदुरबारचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ईश्वर धामणे, दीपेश धामणे राज्य संघटनेचे सहसचिव देशमुख, जिल्हा संघटनेचे. राजेंद्र भोई, योगेश निकुंभ, धनराज अहिरे, शोभराज खोंडे, आदी उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी व संघटनेचे कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी, भूषण कुलथे, श्रीकांत चव्हाण, भूषण कुलथे, कुणाल चौधरी, सचिन गोंधळी, चंद्रकांत पाटील,दीपेश गायकवाड व अन्य परिश्रम घेत आहेत.









