Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैधपणे मदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
October 8, 2023
in क्राईम
0
अवैधपणे मदयाची वाहतुक करणाऱ्या वाहनासह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ- विभाग नंदुरबार यांच्या पथकाने विसरवाडी- साक्री रस्त्यावर हॉटेल अॅपलच्या बाजुला तिडासर शिवार ता. नवापूर येथे अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना आयशर वाहनासह 20 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त.

मिळालेल्या गुप्त बातमीनुसार विसरवाडी साक्री रस्त्यानजीक हॉटेल अॅपलच्या बाजुला असलेल्या मोकळया जागेत तिडासर ता. नवापूर येथे टाटा कंपनीची सहाचाकी वाहन ( क्र.एम.एच-14- सी.पी. 4028) असे उभे असल्याबाबत माहीती मिळाली. सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल स्पेशल प्रिमीअम व्हिस्की 180 मि.ली. क्षमतेच्या 27 बॉक्स, इंमपेरील ब्लु व्हिस्की 180 मि.ली. 31 बॉक्स ऑल सिजन व्हिस्की 750 मि.ली. व 180 मि.ली. 41 बॉक्स, टयुबर्ग बियर 500 मि.ली. 15 बॉक्स, किंगफिशर बियर 500 मि.ली. 7 बॉक्स, रॉयल चॅलेज व्हिस्की 750 मि.ली व 180 मि.ली. 20 बॉक्स व विविध ब्रन्डचे असे एकुण 150 बॉक्स आढलून आले.

सदर वाहनातील चालक व साथीदार यांनी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडुन पळ काढला. सदर कारवाईत वाहनासह एकुण 20 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयात दिपक कालीया रा. सिल्वासा, तारकनाथ उर्फ सुरेश भवानीप्रसाद सिंग, गाडी चालक व मालक फरार आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कलम 65(अ)(ई),80,81,83,98 (2), 108 अन्वये करण्यात आली.

सदरची कार्यवाही दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग नंदुरबार प्रशांत एस पाटील,निरीक्षक डी. एम. चकोर, बी.एस. महाडीक दुय्यम निरीक्षक पी. जी. मेहता, जवान सर्वश्री मोहन पवार, हंसराज चौधरी, भुषण चौधरी, अजय रायते वा. चालक मानसिंग पाडवी यांनी केली. सदर कारवाईस सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, पो.हे.कॉ. राजु कोकणी, पो. ना. अनिल राठोड, पो. शि. लीनेश पाडवी विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रशांत एस. पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

’आयुष्मान भारत’ योजनेत मिळणार वर्षाला ५ लाखांचा विमा;आर्थिक दुर्बलांनी बनवावे स्वत:चे ‘आयुष्मान भारत’ कार्ड :डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add