नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा ते सारंखेडा, शहादा ते शिरपूर, जयनगर ते कोंडावळ रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून पाच नोव्हेंबर पर्यंत सारंखेडा पुलाचे काम व रस्ता दुरुस्तीचे काम झाले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचे इशारा उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिला. या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आंदोलनाला हजारों नागरिकांनी पाठिंबा दिला.

शहादा येथे शेतकरी संघर्ष समिती यांनी पुकारलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनात तमाम शादेकरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला शहादा ते सारंखेडा,शिरपूर, जयनगर रस्त्याची दुरुस्तीचे काम त्वरित करावे या मागणी साठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात लेखी आश्वासन देऊन ठोस कारवाईसाठी प्रयत्न करावे तरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.पाच नोव्हेंबर पर्यंत सारंखेडा पुलाचे काम व रस्ता दुरुस्तीचे काम झाले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी श्री पाटील यांनी दिला.
या आंदोलनात माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, माजी आ. उदयसिंग पाडवी, राजेंद्र गावित, जि .प उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी उपनगराध्यक्ष जाहीर शेख, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक लक्ष्मण कदम आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता अनंत शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे, उपअभियंता टी.डी.वळवी, प्रांताधिकारी सुभाष दळवी, नायब तहसीलदार गवते, नायब तहसीलदार विजय साळवे आदी उपस्थित होते.









