नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहराचा सुपूत्र असलेला जीशान अकील पिंजारी या विद्यार्थ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परिक्षा पे चर्चा 2023 यासंदर्भात मते जाणून घेतल्याबद्दल प्रशंसा व आभार पत्र मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वाक्षरी असलेले पत्र नंदुरबारच्या जीशान पिंजारी यास मिळाल्याने कौतूक होत आहे.
देशभरात परीक्षा पे चर्चा उपक्रमातून विद्यार्थी व सर्वसामान्यांची मते जाणून घेण्यात येत आहे. बदल्यात काळानुसार तरुणांची परीक्षा व शिक्षणासंदर्भात असलेली संकल्पना यातून समोर येत असून भारताच्या विकासावर परिणाम होण्याच्या दृष्टीने प्रेरित करण्यासाठी निर्णायक भुमिका म्हणून परीक्षा पे चर्चातून विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात येत आहे 2047 पर्यंतच्या अमृत काळासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात नंदुरबार येथील माणिक चौकातील रहिवासी असलेला जीशान अकील पिंजारी याने सहभाग नोंदविला होता.
या परीक्षा पे चर्चाद्वारे जीशान पिंजारीने आपले मत मांडले होते. म्हणुन प्रधानमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वाक्षरी असलेले प्रशंसा व आभार पत्र जीशान अकील पिंजारी यास मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून जीशान पिंजारीचे कौतूक करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. जीशान पिंजारी हा नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील पी.जी.फार्मसी कॉलेजचा तृतीय वर्षातील विद्यार्थी असून जीशान हा नंदुरबार येथील पत्रकार अकील पिंजारी यांचा मुलगा आहे.








