नंदुरबार l प्रतिनिधी
तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी शासनाचे १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी ही फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे हे फेब्रुवारी ते जुलै २०१९ मध्ये नंदुरबार जिल्हाधिकारी असताना या कालावधीत कार्यरत असतांना शासनाने दिलेली महसुली उदिष्टे साध्य करण्यासाठी अनाधिकृत बिनशेती वापर शर्त बंद प्रकरणे भोगवटदार वर्ग-२ धारणा अधिकार भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणे इ. बाबींच्या अनुषंगाने वर नमुद एकुण १६ प्रकरणात सहा जिल्हा निबंधक आणि जिल्हाधिकारी मुद्रांक नंदुरबार यांच्याकडुन मुल्यांकन अहवाल न घेता नजराना / रुपांतरण अभिमुल्य रक्कम निश्चित करुन किंवा इतर अनियमितता करुन शासनाचे एकुण १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० एवढे आर्थिक नुकसान केले आहे.
तसेच उर्वरीत चार प्रकरणात शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच सदरचा आदेश पारित करतांना बनावट जावक क्रमांक आदेशावर नोंदविले आहे. व त्यांची जिल्हाधिकारी म्हणुन प्रधान करण्यात आलेल्या अधिकांचा त्यांनी गैरवापर केला आहे. तसेच व नमुद प्रकरणात आदेश पारित करण्याचे किंवा मंजुरी देण्याचे सर्वतोपरी अधिकारी शासनाचे आहेत. याची त्यांना सुरवातीपासुन जाणीव असतांना देखील आरोपी यांनी स्वताच्या स्वाक्षरीने सदरचे आदेश पारित केलेले आहेत. तसेच प्रत्यक्षात सदर आदेशांना देण्यात आलेल्या क्रमांकावर इतर प्रकरानांनीच नोंदणीही इ आलेली आहे. व चौकशीमध्ये सदरचे प्रकरणे कार्यालयात दाखल न व्होताच सदरचे आदेश तयार करण्यात आल्याने सदरचे बनावट दस्तऐजव द्वारे शासनाची फसवणुक व ठकवणुक करुन शासनाचे उक्त रकमेचे नुकसान केलेले आहे.
बालाजी मंजुळे हे जिल्हाधिकारी पदावर लोकसेवक म्हणुन कार्यरत असतांना शासानाच्या हिताचे व हित संबंधाचे सरक्षण करण्यास विधिता बध्द असतांना देखील त्यांनी शासनाची दिशाभुल करुन अप्रामाणिकणाच्या मालमत्तेचे नुकसान पोहचेल अशा उद्देशाने खोटा दस्तऐवज बनविला व शासकीय बनावट दस्तऐजव तयार करुन शासनाची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐजव करुन तो दस्तऐवज त्यांना स्वतःला बनावट असल्याचे माहिती असतांना सुध्दा तो खरा आहे म्हणुन वापरुन शासनाचे आर्थिक नुकसान करुन फसवणुक केलेली आहे.
म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अनिल गवांदे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या विरुद्ध नंदूरबार पोलीस ठाण्यात भादवी कलम 420,167.
,465,467,468,471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि संजोग बच्छाव करीत आहेत.








