म्हसावद । प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय तळोदा येथे बेमुदत उपोषण करण्यात आले.यावेळी परिसरात कार्यरत विविध सामाजिक संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला. प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी उपोषणकर्त्याना लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.यावेळी कार्यवाही न झाल्यास उपोषणकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचे आवाहन केले आहे.
एकलव्य आदिवासी युवा संघटनाच्या वतीने 3 ऑक्टोंबर रोजीच्या बेमुदत उपोषणाला करण्यात आले दरम्यान सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.साबळे यांनी सायंकाळी 7 वाजे दरम्यान उपोषण स्थळी भेट देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यावेळी प्रकल्प अधिकारी हे आजारी असल्या कारणामुळे येऊ शकले नाही व त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मागण्या पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासनामुळे तथा निवेदन स्विकारल्याने तूर्तास स्थगित करण्यात आले.
यावेळी उपोषण कर्त्यांच्या वतीने १)तोरणमाळ/ कुंभारखान आश्रमशाळेतील दोन्हीही मयत विद्यार्थ्यांच्या व कुटुंबातील वर्ग ३ किवा वर्ग ४ नियमित अथवा रोजंदारी तत्वावर सेवेत ‘सामावून घेणे.
२) सेन्ट्रल खिचन तर्फे देण्यात येणारे अन्नाचे राष्ट्रीय अन्न भेसळ तपासणी संस्था, मुंबई यांच्या अहवाल व FSSI मार्फत निर्देशित करण्यात आलेले अन्न तपासणी अहवाल द्यावे. व दरपत्रक द्यावे.
३) आदिवासी विकास विभाग प्रकल्प तळोदा अंतर्गत आश्रम शाळेतील वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये रोजदारी पेसा भरती करण्यात यावे. व स्थानिक उमेदवाराना प्राधान्य देण्यात यावे.
४) खावटी अनुदान योजना पुन्हा राबवण्यात यावे.
आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडी पक्ष,बिरसा फायटर संघटना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,जयस युवाशक्ती संघटना तळोदा, B.T.S टायगर सेना आदी सामाजिक संघटनांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला.
दरम्यान उपोषण मागे घेऊन तत्काळ मार्ग काढावा. यासाठी तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.साबळे यांनी उपोषण स्थळी सायंकाळी भेट देवून उपोषणाची सांगता करावी म्हणून विनंती केली.मात्र चर्चा निष्फळ ठरली असली तरी आश्वासन व निवेदन स्वीकारल्याने उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले.
दरम्यान सदर प्रश्न हे आदिवासी समाजाचे जिव्हाळ्याच्या विषय असल्याने तात्काळ मार्गी लावण्यात यावे.
अन्यथा सदर उपोषण पुन्हा बेमुदत करण्यात येईल. असे आवाहन केले आहे.
अँड.गणपत पाडवी महाराष्ट्र प्रदेशप्रवक्ता, रवींद्र सोनवणे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ,राकेश जाधव प्रदेश कार्यकारी सदस्य, गणेश दादा कार्यकारी अध्यक्ष नंदुरबार, सुरेश वळवी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष, राजकुमार वळवी प्रदेश सदस्य फत्तेसिंग दादा सचिव,उमेश वसावे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष, शंकर दादा,सुरेश वळवी तळोदा तालुका अध्यक्ष,रमेश पावरा,दिला तडवी,वनसिंग वसावे,रमेश चंद्रसिंग पावरा,सुनील पाडवी,दिनेश पाडवी,मुनेश पाडवी आदी सह विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी उपोषणाला उपस्थित होते.