नंदुरबार l प्रतिनिधी
येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व अश्वमेघराज बुद्धिबळ क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांघिक स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष बळवंत निकुंभ यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे सचिव आकाश जैन, ट्रेझरर जितेंद्र सोनार, युवा उद्योजक उमेश जैन, विवेक जैन, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण १०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघास सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले तर चावरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघास सांघिक द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.
बक्षीस वितरण दि नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन किशोरभाई वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदुरबार मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष बळवंत जाधव, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन डॉ.शिल्पा भंडारी, अनिल शर्मा, प्रितेश बांगड, इसरार अली सैयद, पार्थ चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी किशोरभाई वाणी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभराज खोंडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार किरण दाभाडे यांनी मानले.