नंदूरबार l प्रतिनिधी
का. वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. सचिव भिका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील व संस्थेचे संचालक वासुदेव पाटील, शानाभाऊ धनगर, प्राचार्या सौ.विदया चव्हाण पर्यवेक्षक अनिल कुवर, प्राध्यापिका सौ.के.सी.पाटील, प्राध्यापक शिक्षक, शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयसिंह ईशी व आभार प्रदर्शन अनिल कुवर यांनी केले. सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी ग्राम स्वच्छता केली.








