नंदूरबार l प्रतिनिधी
का.वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती. क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ३ ऑक्टोंबर रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

त्यात इयत्ता पाचवी ते सातवी पहिला गट, आठवी ते दहावी दुसरा गट याप्रमाणे चित्रकला स्पर्धा,रांगोळी, मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला, रांगोळी, मेहंदी स्पर्धेचे आयोजन श्रीमती एम. आर. पाटील, सौ. एस. एस. पाटील, सौ. एस. पी. पाटील व सौ ए. एस. बागुल, सौ सी. व्ही.. पाटील व श्रीमती एम. आर. पाटील यांनी केले सर्व विद्यार्थी स्पर्धकांचे कामाचे कौतुक अध्यक्षानी निरीक्षणांती केले .
निरीक्षण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पाटील,नगाव येथील प्रतिष्ठित नागरीक शानाभाऊ धनगर, रामदास पिंपळे, भालेर ग्रामपंचायत सरपंच सौ. शोभाताई पाटील व ग्रा. प. सदस्या सौ. कविता पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








