नंदुरबार l प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात आणि शैक्षणिक कायद्यामध्ये गेली ३२ वर्षे वकील केल्यानंतर असे निदर्शनास आले की शिक्षकांसाठी न्याय मिळवायचा असेल तर शिक्षकांसाठी केलेला कायदा हाच अपूर्ण आहे आणि या कायद्यात अनेक कलमानमध्ये दुरुस्ती गरजेची आहे परंतु कायदा बनवणे आणि कायद्यात दुरुस्ती करणे हे काम न्यायव्यवस्थेचे नाही तर विधान भवन अथवा संसदेचे आहे त्यामुळेच शिक्षकांच्या न्यायासाठी असणारा लढा हा न्याय व्यवस्थेकडून विधानभवनाकडे वळविणे गरजेचे आहे असे लक्षात आले
म्हणून शिक्षक मतदार संघ नाशिक विभाग २०२४ या निवडणुकीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली आहे थोडक्यात शिक्षकांचा न्यायासाठी असलेला लढा हा सुरूच राहणार केवळ न्यायव्यवस्थेकडून विधानभवनाकडे अशी आंदोलनाची दिशा बदलली आहे.असे ॲड. महेंद्र भावसार यांनी सांगितले.
ॲड. महेंद्र भावसार यांनी नंदुरबारला संवाद साधत शिक्षक आमदारकीच्या निवडणूकीच्या श्रीगणेशा केला. माझा पहिला दौरा असून पत्रकार, वकील बांधवांशी संवाद साधत मी निवडनुकीला सामोरे जात आहे. शिक्षक हाच माझा केंद्रबिंदू आहे. त्यांच्याशी बोलून मी माझे मत मांडणार आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्या वकील या नात्याने मला समजल्या. ५०० पेक्षा अधिक शाळा न्यायाधिकारणाची खटले चालविल्यानंतर कायदयातील त्रुटया लक्षात आल्या. शिक्षकांच्या प्रगतीला कायदे अडथळे ठरतात. ते कायदा दुरुस्त करणे आवशक, असे मला सातत्याने वाटत आले.
याचाच एक भाग म्हणून शिक्षक आमदारकीसाठी मी उमेदवारी करणार आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतू उद्या कुठल्या पक्षाने मला मदत केली तर त्याचाही विचार करेन, असेही ते म्हणाले. कायदयातील काय त्रुटी आहेत, यावर मी प्रबंध केला असून तो शासनाकडे सादर केला आहे. मात्र यावर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. नंदुरबार, नगर, जळगाव, धुळे व नाशिक या पाच जिल्हयात ६८ हजारच्या आसपास मतदार आहेत. २०२४ च्या एप्रिलमध्ये निवडणूका लागणार आहेत, त्यासाठी पहिला संवाद त्यांनी नंदुरबारला साधला.








