नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्ये साधत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग, जि.रायगड यांच्यावतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादुत डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉ.श्री.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली दि १ ऑक्टोबर रविवार रोजी जिल्ह्याभरात विविध ठिकाणी नंदुरबार शहर, दोंडाईचा, शहादा, तळोदा, पानसमेल(मध्यप्रदेश) व सोनगढ (गुजरात) इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात ३५९ श्रीसदस्य सहभागी होऊन १९.५ किलोमीटर दुतरफा व ४३०४ चौरस मिटर शासकीय कार्यालय परिसर स्वच्छता करुन ४ टन ओला व १३ टन सुका एकूण १७ टन कचरा संकलन करुन ट्रॅक्टर व घंटागाडीच्या साहाय्याने शहराबाहेरील डांपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला. डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात वृक्षलागवड व संवर्धन, स्मशानभूमी व कब्रस्थान स्वच्छता, रक्तदान शिबीर, विहीर व बोअरवेल जलपुनर्भरन, प्रोढसाक्षरता वर्ग व गरजू विध्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप या सारखे विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.








