नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी जयंती निमित्त नगर परिषदेच्या वतीने ‘स्वच्छतेसाठी एक तारीख, एक तास’ उपक्रम राबवण्यात आला.यावेळी हाटदरवाजा परिसरातील गांधी चौकात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता पंधरवड्याच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी रविवारी दि. १ ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ हा उपक्रम राबविण्यात आला.
रविवारी सकाळी ११ वाजता गांधी चौकात हातात झाडून घेत शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी नगरसेवक रवींद्र पवार, चेतन वळवी,अभियंता विजय पाटील,अभियंता कांबळी यांच्यासह कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.








