नंदुरबार l प्रतिनिधी
येथील पुरातन गणपती मंदिरात श्री गणेश़ोत्सवा निमित्त साई आर्ट अकेडमीच्या सदस्यांनी माळीवाडाच्या राजा गणपती देवाची रांगोळी साकारण्यास तब्बल ४८ तास कालावधी लागला असून त्यांनी लेक व पिगमेंट कलर चा वापर करून ८ किलो रांगोळी ने माळीवाडाच्या राजाची रांगोळी साकारण्यात आली.
सालाबाद प्रमाणे मानाचा दादा गणपती, लालबाग चा राजा या गणपतींची रांगोळी भाविकांना आकर्षिक केले आहे त रांगोळी कलाकारांचा सत्कार गणपती मंदिर संस्थानचे प्रदीप भट व कर्मचारी महासंघाचे रणजितसिंग राजपूत तसेच उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या हस्ते कला शिक्षक गौरव माळी व त्यांच्या सहकार्यांच्या सत्कार करण्यात आला.
नितेश अग्रवाल यांच्या सौजन्याने रांगोळी रेखाटण्यात आली रांगोळी रेखाटण्यासाठी सानिका उतरवार, हेतल पवार, वैष्णवी चौधरी, निशाल वारुडे, वैदाली सोनार, हर्षाली माहेश्वरी यांनी परिश्रम घेतले.
गणेश भक्तांच्या दर्शनासाठी गणपती मंदिर येथे रांगोळी ठेवण्यात आली आहे असे पुजारी अमोल भट यांनी कळवले आहे.