नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुभाव असल्याने पशुधनाचे एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शेतकऱ्यांनी बैलपोळा सण घरगुती स्वरुपात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 38 इपीसेंटर मध्ये 536 गुरे लंपी चर्मरोग ग्रस्त असून त्यापैकी 162 पशुरूग्ण सुधारले आहेत. सद्यस्थितीत 343 पशुरुग्ण असून 31 मृत झाले आहेत.
पशुसंवर्धन विभागामार्फत या रोगाचे प्रतिबंधक लसीकरणही पूर्ण करण्यात येत असून पशुमध्ये लंपी चर्मरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे. बैलपोळा सणानिमित्त मोठ्या संख्येने पशुधन एकत्रित येत असल्याने ईतर निरोगी पशुधनास लंपो चर्मरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे गोवर्गीय पशुधनास एकत्रित येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आजारी पशुस तात्काळ जवळच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात संपर्क करुन उपचार करुन असेही पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी पसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.