नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील नाभिक समाजाच्या वतीने आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नंदुरबार शहरातील पंचमढीपासून संत सेना महाराजांच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेल्या पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीतून नाभिक समाज बांधवांनी संत सेना महाराजांच्या नामाचा गजर करण्यात आला. तसेच प्रतिमा पूजन कार्यक्रमातून संत सेना महाराजांना अभिवादन करीत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यात आला. तसेच नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्याचबरोबर रक्तदान शिबिर व बालकांची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन नंदुरबार शहर नाभिक समाजाच्या वतीने सोमवारी दि.11 सप्टेंबर 2023 रोजी संत सेना महाराजांच्या पालखी मिरवणूकीसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, रक्तदान शिबिर व बाल आरोग्य तपासणी शिबिर नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराच्या डोममध्ये घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार पालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी, माजी जि.प.उपाध्यक्ष अॅड.राम चंद्रकांत रघुवंशी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे नंदुरबार प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार, बालरोग तज्ञ डॉ.सुदर्शन सुर्यवंशी, ज्येष्ठ नेते अशोक राजपूत यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पवार, माजी नगरसेवक कैलास पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पी.टी.सोनवणे, आर.एन.निकम, नाभिक समाजाचे नंदुरबार शहराध्यक्ष दीपक शिंदे, नाभिक समाज पंचमढीचे अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, सचिव सुनिल वरसाळे, नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे, नाभिक दुकानदार युनियनचे अध्यक्ष धनराज वरसाळे, दिलीप बोरसे, छोटु अहिरे, प्रकाश सैंदाणे, नानाभाऊ सोनवणे,
नाभिक समाज महिला जिल्हाध्यक्षा कुंदाबाई सोनवणे, महिला शहराध्यक्षा गायत्रीबाई सैंदाणे, विमलबाई मंडलिक, नंदुरबार शहर उपाध्यक्ष राजेश पवार, युवा मंचचे अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्ष राहुल ईशी, गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल पी.सोनवणे, उपाध्यक्ष चेतन उमणकर, नारायण शिरसाठ, जयेश वरसाळे, किशोर सोनगडा, पंकज शिरसाठ, सागर पवार, साजन साठे, भुषण सोनवणे, दुर्गेश शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड.राम चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, कोणालाही वेगळे वाटत नाही असे संत सेना महाराजांचे कार्य आहे. संतांची भुमी अशी महाराष्ट्राची ओळख असून या भुमीत संत सेना महाराजांचे कार्य फार मोठे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम यांच्याबरोबर संत सेना महाराजांचे कार्य आहे. संतांना कधीच प्रदेश, जातपात, भाषेची मर्यादा नसते, त्या मर्यादेपुढे माणूस जेव्हा जातो तेव्हा संत असे म्हणतात व मानतात, अशी शिकवण संत सेना महाराजांनी दिली आहे. आजही संत सेना महाराजांची शिकवण आपण आपल्या आयुष्यात पाळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नाभिक समाजातील दहावी, बारावी, पदव्युत्तर व विविध क्षेत्रात यश मिळविणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, भेटवस्तु व प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला.
तसेच रक्तदान शिबिर व लहान मुलांचे आरोग्य शिबिरही घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाभिक समाज पंचमढीचे सचिव सुनिल वरसाळे यांनी केले. आभार शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट, नंदुरबार शहर नाभिक हितवर्धक संस्था, नंदुरबार शहर नाभिक दुकानदार संघटना, नंदुरबार शहर नाभिक महिला मंडळ, नंदुरबार शहर नाभिक युवा मंच यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाजातील तरुणांनी परिश्रम घेतले.