नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शासनाच्या धोरणानुसार महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी आज 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय सभागृह शहादा येथे सोडत काढण्यात येणार असल्याचे, उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शहादा तालुक्यातील एक महसूली गाव एक पोलीस पाटील या धोरणानुसार 60 पदे भरण्यासाठी समांतर महिला आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यावेळी शहादा तालुक्यातील संबंधीत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. दळवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.