नंदूरबार l प्रतिनिधी
मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरद पवार गटाचा मेळावा नुकताच कन्यादान मंगल कार्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.त्यात जिल्ह्यातील सुमारे ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत प्रवेश केला.
प्रकाशा येथील भरत जगन्नाथ लोहार यांच्या नेतृत्वात रविंद्र भटु भिल, दिपक रमण ठाकरे, विष्णु बाबु ठाकरे, चेतन किसन ठाकरे,किरण दिलीप पाडवी, नवनाथ गणेश पाडवी, विष्णु सुभाष बर्डे, बधु महेश वसावे, महेंद्र काशिनाथ पवार, अविनाश रुपा पाडवी, गणेश बाबुलाल भिल, किरण बर्डे, यांच्यासह ६९ अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.तसेच देवा मानवर ता. साक्री जि.धुळे यांच्या नेतृत्वात बापु होडगर, नामदेव टकले, संजय टकले, नानखा पुणेकर, गोटु ईलाक, भावडु ठेलारी, नाना गोयकर, रेमा गोयकर, मगन गोयकर यांच्यासह सुमारे ३०० अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
किरण गुलाबसिंग वळवी यांच्या नेतृत्वात लक्ष्मण शिवाजी पाडवी, अरुण दिना वसावे, कन्हैय्या भिमसिंग वळवी, सुमित बाबसिंग वळवी, इ. कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. रनाळे ता.नंदुरबार येथील नरेंद्र लक्ष्मण नागरे, सोमेश्वर् बापु कापसे, चेतन महेंद्र आव्हाळ, रोहीत सुनिल नागरे, नरेश रोहीदास नागरे, गणेश माधवराव नागरे, नवनाथ धोंडु नागरे, रविंद्र चंद्रकांत नागरे इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तसेच उमर्दे ता नंदुरबार येथील अनिल भरत राठोड,पृथ्वीराज गोरख चव्हाण, विश्वास महादु चव्हाण, अरविंद प्रेमचंद चव्हाण, विपुल राजु चव्हाण गोरख गोविंदा चव्हाण, अश्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
या मेळाव्यात नंदुरबार युवती राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्षपदी कुमारी तिथल जालमसिंग पावरा यांना व अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी निलेश अनिल पाडवी यांना नेमणुकीचे पत्र आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते देण्यात आले. या सर्वांचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पक्षात स्वागत केले असुन शरद पवार यांचा विचारधारेला सामान्य व्यक्तीं पर्यंत पोचविण्यासाठी व पक्ष संघटन वाढविण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे अवाहन केले.








