नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार तालुका विधायक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर प्रारंभ झाला.
स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार तालुका विधायक समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार व नारळ अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी, तालुका क्रीडा संयोजक मीनल वळवी, ज्येष्ठ शिक्षक सुनील पाटील, स्पर्धा संयोजक डॉ.मयूर ठाकरे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी मुकेश बारी, महेंद्र काटे, कल्पेश
बोरसे, क्रीडाशिक्षक शांताराम पाटील, निलेश गावित, प्रा.प्रमोद पवार, प्रा.जगदीश पाटील, आनंदा पाटील, किरण बेडसे, सुनील निकुंभ आदीच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना पुष्पेन्द्र रघुवंशी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना मैदानी खेळात सहभागी होऊन आरोग्य जपण्याचा संदेश दिला सततच्या सरावातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी असून या संधीचे सोनं या स्पर्धेच्या माध्यमातून करावे असे सांगितले.
या स्पर्धेला पंच म्हणून भरत चौधरी राज अहिरे, आकाश बागुल, पंकज चौधरी, अमोल चित्ते, योगेश माळी, राजेश्वर चौधरी जगदीश वंजारी आदी काम पाहत आहेत. या स्पर्धेतून १७ वर्षे वयोगटातील मुला- मुलींचे विजेते संघ नंदुरबार तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हा स्पर्धेत करणार आहे. स्पर्धेला नंदुरबार तालुक्यातून मुलांचे सोळा तर मुलींचे पाच
संघ दाखल झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मयूर ठाकरे तर आभार जगदीश वंजारी यांनी मानले