नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक विद्यार्थ्याने काळजीपूर्वक अभ्यास करुन ज्ञानार्जन केले पाहीजे. ज्ञानी व्हा! ज्ञान ही अशी वस्तू आहे, जी आपल्यापासून कोणीही हिरावून घेवू शकत नाही. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पालकांनी पाल्यांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे. बडगुजर समाज शहरात संख्येने कमी असला तरी सातत्याने उपक्रम राबवून जिल्हावासियांचे लक्ष केंद्रीत असतो, हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते येथील बडगुजर समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
येथील बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह, सराफ बाजार येथे ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ पार पडला. यावेळी सुमारे ७५ विद्यार्थ्यांना चंद्रकांत रघुवंशी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओरिएंट हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, संभाजीनगरचे चेअमन राजेंद्र बडगुजर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे पंचायत समिती सदस्या श्रीमती सुरेखाताई बडगुजर, श्री चामुंडा माता धर्मदाय ट्रस्ट, धुळे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, मेडीकल ऑफीसर, आर.बी.एस.के. तळोदा वंदना बडगुजर, बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार सल्लागार पंडीतराव बडगुजर हे होते.
चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले की, कोणत्याही परीक्षेत मुली अव्वल असतात. त्यांची मेरीट लिस्ट जास्त असते. कारण ते अभ्यासात पुढे असतात. तसे मुलांबाबत दिसत नाही. महिलांना पाणी टंचाईबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात मुबलक पाऊस न झाल्यामुळे पाणी टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे महिलांनी पाण्याची नासाडी थांबवावी. पाण्याची बचत करावी. भविष्यात तापी नदीतून पाणी आणावे लागले तरी त्याबाबत आपण विचार करीत आहोत, असेही रघुवंशी म्हणाले.
अध्यक्षस्थानावरुन राजेंंद्र बडगुजर म्हणाले की, प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनिअर या मागे न लागता अजूनही भरपूर संधी असतात. त्यांचाही विद्यार्थ्यांनी विचार करावा. यावेळी सुरेखा बडगुजर, पंढरीनाथ बडगुजर, वंदना बडगुजर, पंडीतराव बडगुजर यांनीही मनोगत व्यक्त केले.
विशेष सत्कार्थींमध्ये रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झालेले सुर्यकांत बडगुजर, शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेला ललित राहुल बडगुजर, सेवेत पदोन्नती प्राप्त हेमंत संजय बडगुजर, सागर संजय बडगुजर, विभागीय शालेय वुशू स्पर्धेत प्रथम निखिल महेंद्र बडगुजर, गोल्ड मेडलिस्ट आराध्या पंकज बडगुज, कुणाल पंकज बडगुजर अ.भा.राजभाषा हिंदी विभुषण परीक्षेत प्रथम श्रेणी यश दिलीप बडगुजर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व टिफीन वाटपसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल नंदुरबार येथील अशोक बडगुजर, भिका वामन बडगुजर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष दिलीप बडगुजर यांनी केले. सूत्रसंचालन विजय बडगुजर तर आभार सचिव अश्विन बडगुजर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे देविदास बडगुजर, भरत कोतवाल, दिनेश बडगुजर, गणेश बडगुजर, सुरेश बडगुजर, मोहन बडगुजर, रवींद्र बडगुजर, प्रकाश बडगुजर, शरद बडगुजर, संदीप बडगुजर आदींनी सहकार्य केले.