नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील श्री.वीर भगतसिंग व्यायामशाळा मार्फत 2023 साली जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून यावर्षी होणार्या गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,
नगरसेवक दीपक दिघे यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यकारिणी निवडण्यात आली, यावेळी उपस्थित सर्व सभासदांच्या एकमताने अध्यक्षस्थानी कैलाश राजपूत, उपाध्यक्ष धनू मराठे, सचिव वैभव राजपूत व खजिनदार पदी महेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली. तसेच गणेशोत्सव काळात विविध समाजोपयोगी उपक्रम देखील मंडळामार्फत राबवले जाणार आहेत .
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नगरसेवक दीपक दिघे, संस्थापक मुकेश राजपूत व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








