नंदुरबार l प्रतिनिधी
ॲड सुभाष वळवी निर्मित आदिवासी गीताचे गुजरात मधील हापेश्वर ह्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण उत्साहात संपन्न झाले.
गावखेड्यातील कलाकारांचा अस्तित्वासाठी झटणारे,ज्यांचा अनेक कविता,गाणी समाजमाध्यमावर प्रसारित झाल्या आहे,त्यात विशेष व्यसनमुक्तीवर आधारित बनवलेल्या `डांबऱ्या”ह्या गीताचे निर्माते दिग्दर्शक सुभाष वळवी ह्यांचा आगामी गीताचा प्रतीक्षेत असलेल्या दर्शक मित्रांसाठी लवकर गीत रिलीज करणार असल्याचे सुभाष वळवी ह्यांनी सांगितले असुन यंदा ही तिन्ही राज्यातील कलाकारांचा ह्या गीतात अभिनयाचा रुपात समावेश आहे.

त्यामुळे यंदा ही पहिल्या गीताप्रमाणे हे गीत ही दर्शकांचे खास ठरणार हे मात्र नक्की असे मत गीताचे निर्माते सुभाष वळवी ह्यांनी मांडले.
ह्या गीतात मुख्य अभिनयाचा रूपाने तरुणाईवर अधिराज्य गाजवणाऱ्या डेडियापाडा येथील सुप्रसिद्ध कलाकार सरू वसावा आणि नवापूरचे अक्षय गावित ह्यांचा समावेश आहे तर त्यांना सहकार्य म्हणून मुलींचा पूजा आणि ग्रुप तसेच डान्स ग्रुप नंदुरबारचे मुकेश आणि ग्रुप आणि त्यासोबत अनिल वसावे (सल्लीबार) दिपू डान्सर हुणाखांब तसेच बालकलाकाराचा रूपाने नंदुरबार येथील चंचल पाडवी व खापर चे नैतीक लोहार ह्यांचा समावेश आहे.
सदर गीताचे गायन कैशिक वसावा व प्रज्ञा जाधव व रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग सेंधवा येथील रोहिणी रेकॉर्डिंग स्टुडिओ सेंधवा येथे झालेले असून संगीतबद्ध रितेश किराडे ह्यांनी केले आहे,सदर गीताचे लिखाणकाम व सुरबद्ध स्वतः सुभाष वळवी ह्यांनी केले आहे.डेकोरेशन आकेश ठाकूर तर चित्रीकरणाची मुख्य जबाबदारी पानसेमल येथील पुष्पेंद्र भोसले यांनी केली आहे.








