नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या ९ वी वरिष्ठ गट पुरुष महिला फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नंदुरबार तर पुरुष गटात जळगाव संघानेे बाजी मारली. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पुरुषांमध्ये निलेश पाटील तर महिलांमध्ये माधवी ठाकरे या खेळाडूने पटकाविला.
फ्लोअरबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी वरिष्ठ गट पुरुष महिला फ्लोअरबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे दि.२५ ते २७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत महिला गटात विजेता नंदुरबार, उपविजेता नागपूर तर तृतीय क्रमांकावर ठाणे संघाने यश मिळविले.
तसेच पुरुष गटात विजेता जळगाव, उपविजेता नागपूर तर तृतीय क्रमांक वर्धा संघाने पटकाविला. विजेत्या खेळाडूंना राज्य फ्लोरबॉल संघटनेचे सचिव रवींद्र चोथवे, क्रीडा संघटक डॉ.मयूर ठाकरे, जिल्हा सचिव जितेंद्र माळी, दीपक वाडे, भरत चौधरी, नागपूर सचिव स्नेहल भगत, अकोला सचिव चोपडे सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेतून निवड झालेल्या संघ नागपूर येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे यशस्वीतेसाठी आकाश बोडरे, वसीम शेख, योगेश माळी, आकाश माळी, प्रदीप माळी, रुपेश महाजन, मयूर पाटील, अमोल चित्ते, दुर्गेश पवार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष सनेर तर आभार जगदीश वंजारी यांनी मानले.








