Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवक-युवतींनी समाजकार्यात आपले भरीव योगदान द्यावे : पितांबर सरोदे

युवक-युवतींनी समाजकार्यात आपले भरीव योगदान द्यावे : पितांबर सरोदे

team by team
August 25, 2023
in राज्य
0
युवक-युवतींनी समाजकार्यात आपले भरीव योगदान द्यावे : पितांबर सरोदे

नंदुरबार l प्रतिनिधधी

युवक-युवतींनी समाजकार्यात आपले योगदान द्यावे, युवारंग फाऊंडेशन व हिरकणी फाऊंडेशन व्यासपीठाचा पुरेपूर वापर करुन विविध उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यीक पितांबर सरोदे यांनी केले. ते येथील युवारंग फाऊंडेशन व हिरकणी फाऊंडेश यांच्या संयुक्त गौरव समारंभ वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर सहाय्यक निरीक्षक किशोर निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत पाटील, पीएसआय श्री.गुंजाळ वनपरिक्षेत्राचे वनपाल युवराज भाबड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता प्रतिमापूजन व युवारंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कै.जितेंद्र लुळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

प्रास्ताविक हिरकणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी यांनी केले. किशोर निकम यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक पितांबर सरोदे यांना युवारंग जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा.युवराज भामरे यांना युवारंग ज्ञानदा व समाजकार्य पुरस्कार देवून गौरविण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी शिकाल तर टिकाल असे शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. युवराज भाबड यांनी पर्यावरणाचे रक्षण व वृक्ष संवर्धन करावे असे युवक व युवतींना मार्गदर्शन केले.

तर किशोर निकम यांनी कै.जितेंद्र लुळे यांच्या विषयी बोलताना जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असे म्हणत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले. यावेळी भामरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील बीएसएफमध्ये निवड झालेल्या चेतन बोरसे व गोपाल गिरासे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संगीता वाघ यांनी केले व आभार युवारंग फाऊंडेशनचे सचिव राहुल शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, प्रणव पवार, उज्वला गावित, निता मराठे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

कात्राचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, चुकीची जन्म तारीख: वय वाढवत लढवली निवडणूक

Next Post

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

Next Post
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार -सुंदसिंग वसावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add