Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे आंदोलनाचा इशारा

team by team
August 24, 2023
in राज्य
0
आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे आंदोलनाचा इशारा
नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम-अतिदुर्गम भागात काम करूनही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने महासंघाने ३० ऑगस्ट पासून आंदोलन करण्याच्या इशारा दिला असल्याचे आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
       जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ व दुर्गम-अतिदुर्गम भागात ७ ते ८ वर्ष काम करूनही माहे मे २०२३ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशात “भरतीने उमेदवार हजर झाल्यावर कार्यमुक्त करावे” अशी जाचक व अन्यायकारक अट टाकून बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तीन महिन्याचा काळ लोटूनही बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटूनही आश्वासनांच्या पलीकडे काही कार्यवाही झालेली नाही. याउलट दरम्यानच्या काळात काही आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
       बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करावे या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी दि. ३० ऑगस्ट २०२३ पासून जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करणार असल्याची नोटीस जि.प.प्रशासनाला बजावण्यात आली आहे. याप्रसंगी प्रकाश मराठे, वंदना वळवी, यशोदा वळवी, शिला कोकणी, शिवराम पाडवी, श्रीराम सूर्यवंशी उपस्थित होते. आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष योगेश्वरानंद गिरी व चिटणीस सतीश जाधव यांनी केले
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्रातील सर्व जि.प.अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार- डॉ. सुप्रिया गावित

Next Post

जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तर्फे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add