नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. असून 2024 वर्षासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन पुण्यातील महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मोरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
बाल शक्ती पुरस्कार हा ज्या मुलांनी 5 ते 18 वर्षाच्या कालावधीत शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
बालकल्याण पुरस्कार हा वैयक्तिक व संस्थास्तरावर दिला जातो. वैयक्तिक पुरस्काराठी मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संस्था स्तरावरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसणाऱ्या व बालकल्याण क्षेत्राात किमान 10 वर्षे सासत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थेस हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
पुरस्कारांची माहिती व अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत स्विकारण्यात येतील, असेही श्री. मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.