नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वस्तिक सिमेंट यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वप्रथम राष्ट्रीय तिरंगा ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंत स्वस्तिक सिमेंट पत्रे सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व चॉकलेट वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच राहुल वसावे, उपसरपंच निरंजन अग्रवाल, मुख्याध्यापक,शिक्षक, कंपनीचे प्रतिनिधी
जगदीश देसले आदी उपस्थित होते.