नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसा निमित्त दि.14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेले होते.
5 किमी धावणे मॅरेथॉन स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत वयोगटातील मुले प्रथम आमश्या भुरा वसावे, व्दितीय कार्तिक वाल्मीक चव्हाण,तृतीय कुलदीप मंगलदास वसावे व 5 किमी धावणे मॅरेथॉन स्पर्धेत इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंत वयोगटातील मुली प्रथम शकील वसावे, व्दितीय योगिता संजय वळवी,तृतीय अरीता नरेश वसावे तसेच 10 किमी धावणे मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष खुला गट – प्रथम दिनेश सजन वसावे, व्दितीय भगतसींग रामसिंग वळवी, तृतीय आशिष राजेंद्र जगताप व 6 किमी धावणे
मॅरेथॉन स्पर्धेत महिला खुला गट – प्रथम आरती अर्जुन पावरा, व्दितीय मेहेक मंगलदास वसावे, तृतीय सोनाली गणपत पाडवी हे खेळाडू प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने विजयी झालेले असुन सदरील खेळाडूंना 5000 ,3000 व 2000 रोख पारितोषिक व प्रमाणपत्र दि.15 ऑगस्ट 2023 रोजी नाट्य मंदीर, नंदुरबार येथे ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात येणार आहे
सदर मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन ना.डॉ.विजयकुमार गावित साहेब वाढदिवस आयोजन समितीच्या अध्यक्षा खा. हीना गावित, उपाध्यक्ष प्रा.डॉ. ईश्वर धामणे, सचिव बळवंत निकुंभ यांच्या वतीने करण्यात आलेले असुन तसेच नंदुरबार शहरातील क्रीडा शिक्षक, मिनलकुमार वळवी, राज जयकर, मधुकमल हिवाळे, श्रीराम मोडक, फारुक पठान, जगदीश वच्छाव, निलेश गावीत, भागुराव जाधव, खुशाल शर्मा, कुणाल भट, नंदु पाटील, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, अशोक वसईकर, मुकेश बारी, महेंद्र काटे, दिपेश धामणे, सागर तांबोळी, बायजा पावरा, मंगलदास वसावे यांचे सहकार्य लाभले.