Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठी बातमी : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालक ठार

team by team
August 17, 2023
in क्राईम
0
मोठी बातमी : बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालक ठार

नंदूरबार l प्रतिनिधी

आपले आजोबांसोबत शेतातून घरी परत येत असलेल्या एका दहा वर्षीय बालकावर पाठीमागून येऊन बिबट्याने हल्ला केला. यात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास दलेलपूर शिवारात घडली. याप्रकरणी वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून पोलीसातही नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रानमहू ता तळोदा येथील खेत्या पारशी वसावे व त्यांचा नातू गुरुदेव भरत वसावे हे आपल्या मालकीचे औत घेऊन दलेलपूर शिवारात शेतमालक गुलाब सत्तार धानका यांच्या कपाशीच्या शेतात कोळपणी करण्यासाठी गेले होते. कोळपणी संपल्यानंतर आजोबा व नातू आपल्या रानमहू गावाकडे येत असतांना एका उसाच्या दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुरुदेव या दहा वर्षीय बालकावर जबर हल्ला करून त्यास उसाच्या शेतात फरफटत नेले.

 

हाप्रकार आजोबा खेत्या वसावे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी बिबट्यावर काठीने वार केले. बिबट्याने सदर बालकास तेथेच सोडून पळ काढला. परंतु सदर बालकाच्या चेहऱ्यावर व मानेवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याने अधिक रक्तस्राव झाला होता. आजोबा व वडिलांनी बालकास उसाच्या शेतातून काढून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

 

ही घटना वन विभागास माजी पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी कळवल्यानंतर उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील ,वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे, वनरक्षक वासुदेव माळी व वन कर्मचाऱ्यांनी रानमहू गावाकडे धाव घेतली व घटनास्थळी भेट दिली. शिवाय घटनेच्या पंचनामाही केला. दरम्यान खेत्या वसावे यांनी सदर घटनेबाबत पोलिसात खबर दिल्यावर तळोदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालक मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली. त्यानंतर पिंजरा लावण्याची कारवाई सुरू केली आहे. यापूर्वीही बिबट्या व मादीच्या सतत मुक्त संचार सुरू आहे. एवढेच नव्हे अगदी दिवसाढवळ्या देखील दोन तीन बिबटे हिंडताना दिसून येतात त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.

 

आमदार राजेश पाडवी यांनी माहिती कळताच उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांनी वनविभागालाही कारवाई करण्याचे सूचित केले. दरम्यान विधिमंडळातही आमदार राजेश पाडवी यांनी बिबट्याचा हल्ला व त्यामुळे होणारे नुकसान यावर आवाज उठवला होता मात्र वनविभाग कारवाई करत नसल्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फेमाजी सैनिक व वीर पत्नी यांचा गौरव

Next Post

ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Next Post
ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add