नंदूरबार l प्रतिनिधी
9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे अधिकारी व कर्मचारी आणि विश्व आदिवासी सेवा संघटनेतर्फ रुग्णालयात वृक्षारोपण व रक्तदान शिबिर व रुग्णाना ब्लॅंकेट वाटण्यात आले तसेच नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात आदिवासी क्रांतिवीराच्या प्रतिमा चे पूजन करण्यात आले.
विश्व आदिवासी दिनानिमित्त व बिरसा मुंडा व सर्व क्रांतीवीरांचे माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे,डॉ.नरेश पाडवी, डॉ.राजेश वसावे डॉ. कृष्णा वळवी यांनी दिली.या वेळी डॉ.प्रज्ञा वळवी, डॉ.सुलोचना बागुल, डॉ. नितीन पाडवी, डॉ.संजय गावीत, डॉ.किसन पावरा,डॉ.निलेश वळवी, डॉ.मंगलसिंग पावरा,डॉ.कमलाकर चौरे, डॉ.तुंगारे व कर्मचारी नर्सिंग कॉलेज प्राचार्य जितेंद्र चव्हाण नर्सिंग चे विद्यार्थी तसेच विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र टी बागुल, केंद्रीय सचिव संभाजी जगताप,
केंद्रीय सहसचिव विनायक के.गावीत, केंद्रीय सदस्य सुभाष जी. कोकणी, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष गुलाब एस.गावीत ,नंदुरबार तालुका अध्यक्ष दिनेश जी.सोनवणे नवापूर तालुका अध्यक्ष नितेश एन कोकणी, धडगाव तालुका अध्यक्ष कालूसिंग डी.वळवी, नंदुरबार जिल्हा सदस्य शरद बी. पाडवी, किशोर गवळे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









