नंदुरबार l प्रतिनिधी
‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ झाला असून त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज ‘पंचप्रण’शपथ घेण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी आदि अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.