नंदुरबार l प्रतिनिधी

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज (दि.९) सकाळी १० वाजता पांरपारिक उत्सव साजरा न करता मणिपूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व आदिवासींवर होणार्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्कासाठी जिल्ह्यांतून हजारोच्या संखेने आदिवासी बांधव जनअक्रोश मोर्चा काढणार असुन
शहरातील महाराणा प्रताप चौक नंदुरबार येथुन मोर्चाची सुरुवात होऊन ते जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे समापन होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त आदिवासी संघटनांतर्फे करण्यात आले आहे.
मणिपुर राज्यातील आदिवासी स्त्रियांना निर्वस्त्र करुन त्यांची नग्न धिंड काढण्यात आली. बलात्कार करुन त्यांची निघृन हत्या करण्यात आली. त्यांना वाचवण्यायस गेलेल्या भाऊ व वडीलांची देखील हत्या करण्यात आली आदिवासी समाजाची हजारो घरे जाळली. १५० पेक्षा जास्त आदिवासीची हत्या करण्यात आली ५० ते ६० हजार लोकांना बेघर करण्यात आले.
मागील तीन महिन्यापासुन मनिपुरमधील आदिवासीवरील अन्याय व क्रर अत्याचार रोखण्यास केंद्र व राज्य सरकार टाळाटाळ करीत आहेत. मध्यप्रदेश राज्यात आदिवासी व्यक्तींवर भाजपाच्या कार्यकर्ता असलेला ब्राम्हन समाजातील शुक्ला नावाचा निच व्यक्तीने अंगावर लगुशंका केली. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी वस्तीगृहातील अल्पवयीन मुलींना पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट मध्ये नाचायला लावले. समान नागरीक कायदा आणुन आदिवासींना संविधान सभेमध्ये दिलेले महामानव जयपालसिंह मुंडा यांनी ५ वी, ६ वी अनुसुची व पेसा कायद्या पासुन वंचित ठेवून आदिवासीचे अस्तित्वच नष्ट करीत आहेत म्हणुन या कायद्याला देखील समस्त आदिवासी समाजा तर्फे तिव्र निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकाराकळून वन सर्ंवधन दुरुस्ती विधायक २०२३ ला मंजुर केले आहे हे आदिवासी समुदायासाठी घातक असुन वन सर्ंवधन दुरुस्ती कायदा रद्द करावा व जल, जंगल, जमिनींचा जो आधिकार आहे त्याला सुरक्षित ठेवावे. जिल्ह्यांचा प्रत्येक तालुक्यात कोणतेही गट, तट, पक्ष-पंथ, मानपान, पद प्रतिष्ठ बाजुला ठेवून केवळ आणि केवळ आदिवसी या नावाने एकत्रित येवून निषेध जन आक्रोश मोर्चा ऐतिहासिक करायचा आहे.
त्यामुळे ९ ऑगस्टला जिल्ह्यात वेगळे कार्यक्रम घेवू नये असे आवाहन समस्त आदिवासी समुदाया मार्फत केले आहे. निषेध जन आक्रोश मोर्चा मध्ये सर्व आदिवासींनी पारंपारीग पेहेराव / काळे वस्त्र परिधान करुन किंवा काळे वस्त्र नसल्यास काळा रुमाल, काळी पट्टी बांधुन सहभागी व्हावे. जन आक्रोश मोर्चा मध्ये दुखवटा व्यक्त करायचा असुन नंदुरबार जिल्ह्यातील वास्तव्यास असणार्या आदिवसी समुदायाने मयत विधीत वाजवले जाणारे रुढी पारंपारीक वाद्य सोबत घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









