Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील युवकाची हातोडा पुलावरून उडी घेत आत्महत्या

team by team
August 4, 2023
in क्राईम
0
तळोदा येथील युवकाची हातोडा पुलावरून उडी घेत आत्महत्या

तळोदा l प्रतिनिधी

तळोदा येथील १८ वर्षीय तरुणाने हातोडा पुलावरून उडी मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नदीत उडी घेतल्याचे नागरिकांना दिसताच पोलिसांना माहिती देण्यात आली.

पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने नदी दुभडी भरून वाहत असल्याने अद्याप मृतदेह आढळून आलेला नाही. नदीत उडी का घेतली याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. उडी घेतलेल्या तरुणाच्या शोधासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते.

बुधवार दि. ०२ ऑगस्ट साय. ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओजस सुनिल सोनार (वय १८ ) रा. जैन वाडी समोर असे पाण्यात उडी घेणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो जैन वाडी समोर कुटूंबीयांसह राहत होता. बुधवारी अचानक तो मोटार सायकल घेवून घरून निघून गेला. बराच वेळ झाला, परंतू घरी आलाच नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. ८ वाजे दरम्यान त्याचा मित्र साहिल जोहरी याने भ्रमण्वनीद्वारे ओजसने हातोडा पुलावरून पाण्यात उडी मारली असल्याचे सांगितले. सदर शब्द कानी पडताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला. तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर त्याचे निकटीय असलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद सोनार, हीतेश सोनार, प्रमोद सोनार, योगेश सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विजय मराठे यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ओजस याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. २४ तास होऊन देखील ओजसचा कुठेही तपास लागला नाही. याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी गुजरात राज्यातील निझर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास यंत्रणा युद्ध पातळीवर ओजसचा शोध घेण्याचे काम करत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य

Next Post

महिला अल्प बचत एजंटांना अस्लास कार्डाचा पुरवठा करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Next Post
महिला अल्प बचत एजंटांना अस्लास कार्डाचा पुरवठा करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

महिला अल्प बचत एजंटांना अस्लास कार्डाचा पुरवठा करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add