नंदूरबार l प्रतिनिधी
महसूल दिनानिमित्त अंध व दिव्यांग व्यक्तींना दाखले व अनेक योजनांच्या लाभ देण्यात आला. यात संजय निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्ध निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी वेतन वृद्ध योजना, वाटणीचे आदेश, भूविकास बँक, खाते फोड, ग्रामपंचायत जन्माचे दाखले शिधा पत्रिका , दारिद्र्यरेषेखालील कार्ड वाटप, नमुना नंबर आठ चा उतारा, अशा अनेक महत्त्वाचे कागद यावेळी देण्यात आलेत, असे महत्त्वाचे कागदपत्र नसल्याने अंध अपंग आणि दिव्यांग लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असतो याच्याच विचार करत जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी या व्यक्तींना स्वतःच्या हस्ते या दाखल्यांचे वाटप केले.
नंदुरबार तालुक्यातील लोय आश्रम शाळेत या दाखल्यांचे वाटप करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी बद्रीझिरा येथील सुकलाल पवार या दोघी डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीला एका चांगल्या योजनेच्या लाभ मिळाल्याने, त्यावेळी या अंध व्यक्तीने जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या भरभरून कौतुक करून आभार मानले असून, आमच्यासारख्या लोकांना न्याय देण्याचे काम सुप्रिया गावित यांनी केलं आहे. आमच्यासारख्या अनेक असे लोक आहेत त्यांना देखील ताई तुम्ही नेहमी मदत करत असतात या भावना देखील या व्यक्तींनी व्यक्त केल्या आहेत.. या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नंदुरबार तालुक्यातील बद्रीझिरा, गुजरजाभोली, लोय, पिंपळोद या परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
महसूल सप्ताहाच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, प्रांत अधिकारी मंदार पत्की, तहसीलदार नितीन गर्गे, यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.








