मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व आरंभ सार्वजनिक प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य गोटूसिंग वळवी व अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जहाँगिर वसावे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे शिक्षक प्रेमसिंग पाडवी यांनी केली. त्यानंतर बार्टीचे समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ब्रिटिशकालीन प्रतिसरकार ही संकल्पनेविषयी माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोटूसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात जहाँगिर वसावे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे शैक्षणिक योगदानाविषयी माहिती दिली. कार्यक्रमास हीरालाल वसावे, अनिल वसावे, राजेंद्र परमार, लोटन अहिरे यांची प्रमुख उपस्थिति होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रेमसिंग पाडवी यांनी केले तर आभार शिक्षिका मीनाक्षी पाडवी यांनी मानले.








