नंदुरबार l प्रतिनिधी
आता सेवा निवृत्तांनाही ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले असून याबाबत शासनातर्फे अध्यादेश जारी करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी, संबंधित कार्यालयात ये-जा करण्यासाठी, निवृत्ती वेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, जेष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत 23 फेब्रुवारी 2017 च्या परिपत्रकां अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत.
असा अध्यादेश राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी रा.भा. गायकवाड यांनी जारी केला आहे. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी दिली.








