नंदुरबार l प्रतिनिधी
दोंडाईचा रस्त्यावर रनाळे गावाजवळ दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघांना दुखापती झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की. दि.3 ऑगस्ट सायंकाळी ७:४५ च्या सुमारास भिकेसिंग राजपूत (वय २५) रा. वावद हे मोटारसायकल क्र. एम. एच. ३९ ए.ए. ३७१३ ने दुध घेऊन नंदुरबारकडे रवाना होत असतांना रनाळे गावाजवळ समोरून येणारे मोटारसायकल (क्र.एम.एच. ३९ ए.ए. ६१५२) ने जोराची धडक दिली. या अपघातात भिकेसिंग राजपूत यांचा मृत्यू झाला तर समोरील मोटारसायकलीवरील स्वार राजु भिमराव भिल (वय १८), रविंद्र देविदास मिल (वय १५) लखन उत्तम मिल (वय १५) या तिघांच्या पायास दुखापती झाली आहे.
अपघातानंतर जखमींना नाळे ग्रामिण रुग्णालायात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी अपघातस्थळी व रनाळे ग्रामिण रुग्णालयाबाहेर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
याप्रकरणी जितेंद्र उदेसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध भादवी कलम 304 (अ),२७९, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ देविदास नाईक करीत आहेत.








