नंदुरबार l प्रतिनिधी
विना सहकार नाही उद्धार या वक्तीप्रमाणे सहकार क्षेत्रला 125 वर्षाचा वारसा लाभला आहे.जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या समृद्धीसाठी सहकारी बँकां व पतसंस्थांच्या सभासदांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे लवकरच आयोजन करण्यात येईल अशी माहिती सहकार भारतीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अँड. कालिदास पाठक यांनी दिली.
येथील श्री माळी ब्राम्हणवाडीत आयोजित पंडित दीनदयाल नागरी सहकारी पतपेढीच्या वार्षिक सभेत
अँड. कालिदास पाठक बोलत होते. याप्रसंगी पतपेढीचे चेअरमन एन.ओ. माळी अध्यक्षस्थानी होते.पुढे बोलताना
कालिदास पाठक म्हणाले की, सहकार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणे गरजेचे आहे.
पतसंस्था सहकारी बँका विविध कार्यकारी सोसायटी हे महत्त्वाचे घटक असून अर्थक्षेत्रात नंदुरबार जिल्ह्यात सहकार क्षेत्र आणखी भक्कम व्हावे यासाठी तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल.या बैठकीत सहकार भारतीची नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी नुकत्याच झालेल्या लखनऊ येथील राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देऊन सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली.